Pandharpur Temple Development Project: दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Vitthal Rukmini Temple of Pandharpur) हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत आहे. इसवी सन 516 मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास असणाऱ्या अनेक जुन्या पुरातन घटनांचा उल्लेख आढळतो. याच मंदिरात तो गेल्या सातशे वर्षांपासून कटीवरी हात विटेवरी उभा आहे. आता याच मंदिराचं रुप बदलणार आहेय. कारण मंदिराच्या आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. (How will the temple of pandharpur look like? maharashtra cm approves development project know details In marathi)
मंदिराच्या 73.85 कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये विठ्ठल मंदिर, सभामंडप, रूक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, नामदेव पायरी, नगारखाना आणि इतर छोट्या मंदिरांचा समावेश आहे. विकासानंतर मंदिराला प्राचीन मूळ रुप प्राप्त होणार आहे. मंदिराशी सुसंगत काळ्या किंवा लाल दगडांचा वापर केला जाणार आहे. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा विकास (Pandharpur Temple Development Project) होणार आहे.
गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Chief Minister Eknath Shinde) आषाढीची पूजा केली होती. त्याचवेळी मंदिर समितीनं मंदिराच्या जीर्णोद्धाराची मागणी केली होती. महत्त्वाचं म्हणजे मंदिराचं रुपडं पालटण्याबरोबरच वारक-यांसाठीही अनेक सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. या विकास आराखड्यामुळे मंदिर परिसर आणखी संदुर होणार आहे, आणि मंदिरालाही गतवैभव पुन्हा मिळणार आहे.
आणखी वाचा - Pandharpur Temple: 1 टन द्राक्षं वापरुन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरेख सजावट
पंढरपूर विकासासाठी 73 कोटी 80 लाख रुपयांच्या मंदिर विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर पाणी गळती रोखणे, दगडी बांधकाम आवश्यकतेनुसार दुरुस्त करणे, मंदिर परिसरातील दीपमाळांची पुनर्बाधणी करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत.