रुग्णालयाने कोरोना नेगेटिव्ह समजून पॉझिटिव्ह महिलेलाच सोडले घरी

ही महिला घरी पोहोचल्यानंतर तिच्या नातेवाईकांना आश्चर्य वाटले. 

Updated: Jul 23, 2020, 10:46 AM IST
रुग्णालयाने कोरोना नेगेटिव्ह समजून पॉझिटिव्ह महिलेलाच सोडले घरी title=

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी: परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. बुधवारी दुपारी रुग्णालयातून कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाऐवजी पॉझिटिव्ह रुग्णालाच घरी सोडण्यात आल्याची खळबळजनक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

कोल्हापुरात लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार होणार

तीन दिवसांपूर्वी पूर्णा येथील एक कोरोनाबाधित महिलेला जिल्हा रुग्णालयात आयसोलेट करण्याचे आले होते. परंतु, अवघ्या तीन दिवसातच या महिलेला रुगणालयातून कोरोना निगेटिव्ह झालात म्हणून सुट्टी देण्यात आली. सदर महिला घरी पोहोचल्यानंतर तिच्या नातेवाईकांना आश्चर्य वाटले. त्यांनी अधिक चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. 

कोरोना : अवाजवी बिलाला चाप, खासगी दवाखान्यांची बिले तपासण्यासाठी लेखापरीक्षक नेमण्याचे निर्देश

गंगाखेड येथील निगेटिव्ह झालेल्या आणि नावात साम्य असलेल्या एका महिलेऐवजी पूर्णा येथील पॉझिटिव्ह महिलेलाच डिस्चार्ज दिल्याची बाब उघडकीस आली. रात्री उशिरा या कोरोना पॉसिटीव्ह महिलेला रुग्णवाहिका पाठवून पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंगाखेड येथील कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

तसेच पॉझिटिव्ह महिलेला घरी पाठवल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून तात्काळ चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने समिती नेमण्यात आली आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.