जळगावात आभाळ फाटले, पहिल्याच पावसात 2 बळी, माजी नगरसेवक वाहून गेला

Jalgaon Rain Update: मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यात हाहाकार, दोन जण बेपत्ता झाले आहेत तर दोन जणांचा मृत्यु झाला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 6, 2023, 06:15 PM IST
जळगावात आभाळ फाटले, पहिल्याच पावसात 2 बळी, माजी नगरसेवक वाहून गेला title=
Heavy rain in maharashtra jalgaon ex corporator drown in flood water

Jalgaon Rain News: जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला आहे. मध्यरात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यात हाहाकार माजला आहे. मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळं नदी- नाल्यांना अचानक पूर आल्याने शहरात पाणी शिरले आहे. तर, अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळं जिल्ह्याती रावेर शहरातील दोन जण बेपत्ता झाले आहेत. यात शहरातील माजी नगरसेवकाचाही समावेश आहे. तर मोरव्हाल येथील दोन जणांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच रसलपुरमध्ये चार गुरांचा मृत्यु झाला असून बलेनो चारचाकी गाडी वाहून गेली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Jalgaon Rain Alert)

रावेर तालुक्यात रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. अचानक पावसाने जोर पकडला व दोन ते तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे रावेर शहरातील नागझिरी नदी, मात्रान नदी, रसलपुर नदीपात्रात वाढ झाली. नदीचे पाणी शहरात घुसल्याने ठिकठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अचानक पाणी वाढल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. नागझिरी नदीत एक व्यक्ती तर मात्रान नदीत रावेर शहरातील एक माजी नगरसेवक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. तर मोरव्हाल येथील अभोडा नदीत दोन जणाचा मृत्यु झाला आहे.

जिल्ह्यातील रसलपुरमध्ये बलेनो ही चार चाकी गाडी वाहून गेल्याचीही माहिती आहे. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत गाडीतील प्रवाशांनी खाली उडी घेतल्याने सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहे. रमजीपुर रसलपुर, खिरोदा गावांमध्ये अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच रमजीपुरमध्ये आलेल्या पुरानेमुळे चार गुरे वाहून गेले आहे. महसूल प्रशासन तालुक्यात अजुन कुठे नुकसान झाले आहे याचा शोध घेत आहे. महसूल प्रशासन तात्काळ बचत कार्य करत दोन व्यक्तीचा शोध घेत आहे.

नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात शेतकरी अडकले

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातही पावसाने धुमाकुळ घातला आहे. पाळा गावाच्या शिवारात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसाने नाल्याला पूर आला. नाल्याला पुर आल्याने नाल्यापलीकडे शेतात काम करायला गेलेले पस्तीस शेतकरी अडकून पडले होते. यात महिला शेतकरीही होत्या. पाणी कमी होत नसल्याने अखेर शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांची जेसीबीच्या मदतीने सुटका करण्यात आली.