लातूरसह सर्व दहा तालुक्यात अतिवृष्टी

 जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झालं आहे. लातूरसह सर्वच दहा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात १०४.३४ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी का होईना दिलास मिळाला आहे.

Updated: Aug 21, 2017, 02:05 PM IST
लातूरसह सर्व दहा तालुक्यात अतिवृष्टी title=

लातूर : जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झालं आहे. लातूरसह सर्वच दहा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात १०४.३४ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी का होईना दिलास मिळाला आहे.

या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, ओढे हे भरभरून वाहत आहेत. लातूर शहराला पाणी पुरवठा करणारी मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे. नागझरी धरणाचे दोन दरवाजेही उघडण्यात आलेत. मांजरा नदीत आलेल्या या पाण्याचे जलपूजन लातूरचे भाजप खासदार डॉ.सुनील गायकवाड यांनी केलं. असाच पाऊस येत्या काळातही बरसावा अशी अपेक्षा या जलपूजनाच्या वेळी खासदार गायकवाड यांनी व्यक्त केली.