नागपूर : नागपूरमधल्या कळमेश्वर तालुक्याच्या तिष्टी गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापिका झोपत असल्याचं दिसून आलंय.
मंदा येलेकर असं झोपणाऱ्या शिक्षिकेचं नाव आहे. रोज दुपारी २ ते ३ दरम्यान विद्यार्थ्यांना बाहेर पाठवून स्वतः झोपत असल्याचं दिसून आलं. इतकंच नव्हे तर विद्यार्थ्यांचं दप्तर त्या उशी म्हणून देखील वापरत होत्या.
पालकांनी शाळेच्या वेळेत मुलांना बाहेर खेळताना पाहिलं त्यावेळी चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
पालकांनी यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानुसार आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे.