शेपूट तोडून हनुमान लंकेतच राहिला; राजू शेट्टींचा सदाभाऊंना टोला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, सरकार आणि सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष अधीक कडवा बनत चालला आहे. कर्जमाफीच्या मुद्यावरून राजू शेट्टी यांनी सरकारला रावणाची उपमा दिली आहे. तर, जुने सरकारी सदाभाऊ खोत यांना शेपूट तुटलेला हनुमान असा टोला हाणला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 27, 2017, 03:50 PM IST
शेपूट तोडून हनुमान लंकेतच राहिला; राजू शेट्टींचा सदाभाऊंना टोला title=

औरंगाबाद : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, सरकार आणि सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष अधीक कडवा बनत चालला आहे. कर्जमाफीच्या मुद्यावरून राजू शेट्टी यांनी सरकारला रावणाची उपमा दिली आहे. तर, जुने सरकारी सदाभाऊ खोत यांना शेपूट तुटलेला हनुमान असा टोला हाणला आहे.

राजू शेट्टी यांनी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेट्टी यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच लक्ष केले. राजू शेट्टी यांनी तीव्र शब्दांचा वापर करत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर नाव न घेता टोलेबाजी केली. सदाभाऊंच्या नावाचा उल्लेख टाळत राजू शेट्टी म्हणाले, आम्ही आमचा हनुमान लंकेत पाठवला पण, दुर्दैवाने तो शेपूट तोडू त्यांच्यातच राहिला.

सरकारवर टीका करताना शेट्टी म्हणाले, 'कर्जमाफीचे पैसे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ सुरु आहे. सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पेसै देण्याची मानसिकताच नाही'. दरम्यान, दिवसांपूर्वीच सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत रयत क्रांती संघटनेची घोषणा काही केली. तेव्हापासून हा संघर्ष अधिक टोकदार झाला आहे. दरम्यान, सत्ताधारी असलेल्या राजू शेट्टी यांच्या संघटनेनेही शेतकरी प्रश्नांच्या मुद्द्यावर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून शेट्टी यांनी सरकारवरील टीकेची धार वाढवली आहे.