आमदार भास्कर जाधव यांचं नवरात्र उत्सवात पारंपरिक जाखडी नृत्य

 रत्नागिरी जिल्ह्यात देखील नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांनी देखील नवरात्र उत्सवात आपल्या तुरंबव गावी पारंपरिक जाखडी नृत्य करून साजरा केला.

Updated: Sep 27, 2017, 01:57 PM IST
आमदार भास्कर जाधव यांचं नवरात्र उत्सवात पारंपरिक जाखडी नृत्य title=

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात देखील नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांनी देखील नवरात्र उत्सवात आपल्या तुरंबव गावी पारंपरिक जाखडी नृत्य करून साजरा केला.

तुरंबवची ग्रामदेवता श्री शारदादेवीच्या दरबारात दररोज रात्री पारंपारिक जाखडी नृत्य सादर होते. यात माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्करराव जाधव दरवर्षी न चुकता ते शारदेच्या दरबारात नाचतात. रात्री विशिष्ठ पेहरावात जाखडी नृत्यात दंग होऊन श्री शारदेसमोर लीन झालेले पहायला मिळतात. भास्कर जाधव यांचं संपूर्ण कुटुंब दरवर्षी आपल्या तुरंबव गावी येतात. नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाईने शारदा देवीचे मंदिर उजळून निघाले आहे.

पाहा व्हिडिओ