चुरमुऱ्यांच्या नावाखाली सुरु होता गुटख्याचा काळा बाजार

चुरमुऱ्यांच्या नावाखाली सुट्टा गुटखा घेवून निघालेला ट्रक भिगवण पोलिसांनी पकडलाय. यात तब्बल एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा विक्रीसाठी नेला जात असल्याचं निष्पन्न झालंय.

Updated: Aug 4, 2017, 06:54 PM IST
चुरमुऱ्यांच्या नावाखाली सुरु होता गुटख्याचा काळा बाजार title=

पुणे : चुरमुऱ्यांच्या नावाखाली सुट्टा गुटखा घेवून निघालेला ट्रक भिगवण पोलिसांनी पकडलाय. यात तब्बल एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा विक्रीसाठी नेला जात असल्याचं निष्पन्न झालंय.

विशेष म्हणजे पहिल्यांदाच अशा प्रकारे सुट्टा गुटखा सापडल्याने हाच गुटखा विविध कंपनीच्या नावाने बाजारात विकला जात असल्याने अन्न भेसळ प्रशासनापुढे मोठं आव्हान उभं राहिलंय.

एकाच आठवड्यात पुणे - सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णी, यवत पाठोपाठ भिगवणनजिक सलग तीसरी कारवाई झाल्यानं अवैध गुटखा विक्रीमागे मोठी टोळी कार्यरत असल्याचं समोर आलंय. त्यामुळं आता या गुटखा विक्रीला प्रशासन आळा घालणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.