मुंबई: गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही अलर्ट देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुलाब चक्रीवादळाचा आँध्र प्रदेशला मोठा फटका बसला आहे. विशाखापट्टणम, उत्तर आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
विशाखापट्टणम, उत्तर आंध्र प्रदेशातील गावागावांत पाणी शिरलं आहे. अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीला फटका बसला आहे. तरीही जीव धोक्यात घालून अनेक जण पुराच्या पाण्यातून वाहनं घालण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गुलाब चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रवरही होणार आहे. 24 तासांत अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहेत पावसाबरोबर जोरदार वारेही वाहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रिवादळ काल उशिरा रात्री ओरीसा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर आले. त्याची तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली. त्याचा प्रभाव म्हणून राज्यात पुढचे २ ते ३ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता. काही ठिकाणी अति वृष्टी शक्यता आहे. द ओडिशा व द छत्तीसगडच्या जवळ असलेले डीप डिप्रेशन पुढच्या ६ तासात तीव्रता कमी होऊन डिप्रेशन होणार, त्याच्या पुढच्या २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र शक्यता आहे.
27/9, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रिवादळ काल उशिरा रात्री ओरीसा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर आले.त्याची तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली.त्याचा प्रभाव म्हणून राज्यात पुढचे २,३ दिवस मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता.काही ठिकाणी अती वृष्टी शक्यता
- IMD pic.twitter.com/rnauojtOST— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 27, 2021
गुलाब चक्रीवादळाचा परिणाम -आज आणि उद्या महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस pic.twitter.com/QMgxLY7rUN
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 27, 2021