Political News : राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, गुजरातचा फॉर्म्युला महाराष्ट्रात?

Maharashtra Political News : गुजरातमधील ऐतिहासिक (Gujarat Assembly Election 2022) विजयाचा सक्सेस फॉर्म्युला आता महाराष्ट्रातही (Maharashtra ) भाजप (BJP) राबवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

Updated: Dec 10, 2022, 01:35 PM IST
Political News : राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, गुजरातचा फॉर्म्युला महाराष्ट्रात? title=

Maharashtra Political News : गुजरातमधील ऐतिहासिक (Gujarat Assembly Election 2022) विजयाचा सक्सेस फॉर्म्युला आता महाराष्ट्रातही (Maharashtra ) भाजप (BJP) राबवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपने आपले 22 मंत्रीच बदलले. त्यामुळे मोठी नाराजी व्यक्त होत होती. मात्र, मंत्री बदलाचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला. विक्रमी 156 जागा घेत पुन्हा  भाजपने सत्ता हातात घेतली. आता मंत्री बदलण्याचा हा सुपर सक्सेस फॉर्म्युला महाराष्ट्रात भाजप राबविण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोणाची विकेट पडणार याची चर्चा सुरु झालेय. 

भाजपविरोधातला अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर हाणून पाडला

गुजरातमध्ये भाजप 27 वर्षांपासून सत्तेत आहे. भाजपविरोधातला अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर हाणून पाडण्यासाठी भाजपने गुजरातमध्ये एक मोठी आणि धाडसी खेळी खेळली होती. निवडणुकीआधी 14 महिने भाजपने गुजरात सरकारमध्ये मोठे फेरबदल केले. त्याच महाबदलांच्या धाडसी निर्णयाची आता देशभर चर्चा रंगलीय. पक्षाने सप्टेंबर 2021 मध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह सर्व 22 मंत्री बदलले. देशात याआधी कोणत्याही पक्षाने एक वर्ष आधी अशी सफाई केली नव्हती. भाजपने जे धाडस केले त्याचे फळ त्यांना निवडणुकीतून मिळाले आहे. (हेही वाचा -  भाजपचा गुजरातमध्ये 27 वर्षांचा अखंड गड कायम, 'आप'ने कमावलं तर काँग्रेसने गमावलं)

103 जागांवर भाजपने नवे चेहरे दिले

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात रुपाणी सरकारचा एकही मंत्री किंवा दिग्गज नेता नव्हता. सरकारमध्ये केलेल्या मुलगामी बदलांचा हा फॉर्म्युला कमालीचा यशस्वी झाल्याचं दिसत आहे. सरकारमध्ये केलेल्या बदलांनंतर गुजरात निवडणुकीत 182 जागांपैकी 103 जागांवर भाजपने नवे चेहरे दिले. याच्या बळावर गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आता हा फॉर्म्युला महाराष्ट्रासह इतर राज्यातही लागू करण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार असल्याची चर्चा आहे.  त्यामुळे भाजप कोणत्या नव्या चेहऱ्यांना निवडणुकीत उमेदवारी देणार याची चर्चा सुरु झालेय. 

भाजपने सलग सातव्यांदा सत्तेवर

गुजरातमध्ये मोठे यश मिळवून भाजपने सलग सातव्यांदा सत्तेवर येण्याचा इतिहास रचला आहे. (BJP broke Congress's record of 1985 in Gujarat) मात्र, हिमाचल प्रदेशात भाजपला यश मिळवता आले नाही. येथे भाजपने सत्ता गमावली.  मात्र, गुजरात निवडणुकीत सुमारे 30 सभांना संबोधित करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रचाराचा फायदा घेत भाजप पुन्हा एकदा सत्ताविरोधी लाट पार केली आहे. 1995 पासून सलग 27 वर्षे पश्चिमेकडील राज्यात सत्तेत आहेत. मागिल विधानसभेत भाजपचे 99 सदस्य होते. गेल्या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी 49.1 होती. आता त्यात वाढ झाली असून 50 टक्क्यांच्यापुढे गेलीय.