Governor Appoint MLA Hearing : राज्यपाल कोट्यातून होणाऱ्या आमदारकीसाठी ज्या 12 लोकांची नियुक्ती रखडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील 5 वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या प्रश्नाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या नावांची यादी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली आहे. महायुतीने ही यादी पाठवल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.,
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांच्या नावांची यादी जवळपास निश्चित झाली आहे. महायुतीकडून राज्यपालांना सात नावांची शिफारस करण्यात आली आहे. भाजपकडून 3 तर शिंदे, पवार गटाची प्रत्येकी 2 नावं या यादीत असल्याचे समजते. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीविरोधात ठाकरे गटाचे सुनील मोदी यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून 23 ऑक्टोबर पर्यंत उच्च न्यायालय देणार निकाल देणार आहे.
तत्कालीन महाविकासआघाडी(mahavikas aghadi) सरकारने तेव्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Governor Bhagatsingh Koshyari) यांच्याकडे विधानपरिषदेच्या बहुचर्चित 12 आमदारांच्या नावांची यादी पाठवली होती. तात्कालीन महाविकासआघाडी सरकारने पाठवलेल्या आमदारांच्या यादीत राष्ट्रवादीतर्फे एकनाख खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे, काँग्रेसतर्फे रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुध्द वनकर आणि शिवसेनेतर्फे उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर, नितीन बानगुडे पाटील यांच्या नावांची शिफारस केली होती. मात्र, भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत कोणताही निर्णय दिला नाही. यामुळे आमदारांची नियुक्ती होऊ शकली नाही.
दरम्यान, राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे सत्तेतून बाहरे पडले आणि महाविकास आघाडी सरकार रातोरात कोसळले. राज्यात नवे शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. यानंतर आता राष्ट्रवादी पाक्षत फूट असून अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट सोबत घेऊन सत्तेत सहभागी झाले आहे. यामुळे महाविकास आघाडीने कोणत्या नावाची शिफारस केली आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.