दारूच्या नशेनं मुलानं घात केला, जन्मदात्या आईवरच नराधमानं हात टाकला

आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना... जन्मदात्या आईवरच मुलाकडून जबरदस्ती...

Updated: Aug 22, 2021, 07:04 PM IST
दारूच्या नशेनं मुलानं घात केला, जन्मदात्या आईवरच नराधमानं हात टाकला title=

गोंदिया: आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत मुलानेच आपल्या आईवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत कोण केव्हा नात्यानं काळिमा फासेल याचा नेम नाही. अशीच एक नात्याला काळिमा फासणारी घटना घडली.

ही हृदय हेलावून टाकणारी घटना गोंदिया जिल्ह्याच्या रजेगावात घडली. 22 वर्षीय नराधमाने आपल्या जन्मदात्या आईवरच दारूच्या नशेत अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी प्रवीण बिसेनलाअटक केली. तर पीडित महिलेचे तिच्या पती सोबत पटत नसल्याने ती मागील सात वर्षा पासून रजेगावात आपल्या दोन मुलांन सोबत राहत आहे .

पतीपासून वेगळं राहिल्यानंतर मिळेल ते कामे करून आपली उपजीविका करायची. मोठ्या मुलाची संगत चांगली नसल्यानं त्याला दारूचे व्यसन लागलं. हातात कामही नव्हतं त्यामुळे दारूच्या आहारी गेला. गावात सतत दारू पिऊन पडून राहायचा. मिळालेल्या माहितीनुसार काल प्रवीण दारू पिऊन घरी आला. त्याने नशेतच आईवर हात टाकला. 

जन्मदात्या आईवरच अत्याचार केल्याच्या या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडितेने याची तक्रार रावणवाडी पोलिसात केली. पोलिसांनी तातडीनं आरोपी नराधमाला अटक केली.