मुंबई : सातारा जिल्ह्यातील कराड येथील ज्वेलर्स व्यावसायिक राहुल फाळके यांना नोटबंदी आणि जीएसटीमुळे मोठा फटका बसला. त्यांचा व्यवसाय अडचणीत आला. आर्थिक अडचणीत सापडलेल्या राहुल फाळके यांनी आत्महत्या केली. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केलेय. ही पोस्ट व्हायरल होत आहे.
कराड येथील राहुल हे सोने व्यापारी होते. त्यांनी फेसबूक पोस्ट लिहिल्यानंतर रेल्वेखाली आत्महत्या केली. नोटांबदी, जीएसटीला कंटाळून आपण जीवन संपवत आहे, असे म्हणत त्यांनी ही आत्महत्या केली. तसे त्यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून म्हटलेय.
जेव्हापासून नोट बंदी झाली तेव्हापासून सोने चांदी व्ययवसायाला उतरती कळा लागली आणि हे कमी की काय म्हणून GST लागू केला. त्यामुळे संपूर्ण व्यवसाय अडचणीत आला, अशी पोस्ट राहुल यांनी केलेय.
आधीच आमचा व्यावसाय उधारीशिवाय चालत नाही. त्यामुळे उधारीत पैसे अडकलेखूप लोकांवर विश्वास ठेवून त्यांना मदत केली. खूप जणांना अडचणीतून बाहेर आणले.पण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझा फक्त विश्वासघात केला, त्यामुळे आपण आर्थिक संकटात सापडल्याचे राहुळ फाळके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय.