लोकं इथे आलिशान कारपेक्षा बकऱ्या का विकत घेत आहेत... जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

सांगली जिल्ह्यातील आटपाडीत उत्तवेश्वर यात्रेनिमित्त शेळ्या मेंढ्यांचा (market prices) मोठा बाजार भरला आहे.

Updated: Nov 9, 2022, 01:52 PM IST
लोकं इथे आलिशान कारपेक्षा बकऱ्या का विकत घेत आहेत... जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?  title=

सांगली: अनेकदा या जागात आपल्याला कोणत्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजे. कधी कोणाचा भाव कसा वाढेल याचाही काही नेम नाही. कोंबडी (chicken rates today) आधी की अंड ही समजणं जितकं कठीण आहे. तितकंच काही गोष्टी समजणं तर त्याहूनही कठीण आहे. कधी कधी काही गोष्टी या वाटतात महाग पण त्याच स्वस्त असतात आणि ज्या गोष्टी स्वस्त वाटतात त्याच महाग ठरतात. तुम्हाला माहितीये का असाच काहीसा प्रकार सांगलीतही पाहायला मिळाला आहे. ज्याच निमित्त होतं एक यात्रा (yatra today). या यात्रेत चक्क शेळ्या, मेंढ्या आणि बकऱ्यांची किंमत वाचून तुम्हाला धक्काच बसेल. (goat and sheep market on occasion of uttareshwar deva yatra of atpadi sangali marathi news)

सांगली जिल्ह्यातील आटपाडीत उत्तवेश्वर यात्रेनिमित्त शेळ्या मेंढ्यांचा (market prices) मोठा बाजार भरला आहे. लक्झुरियस कारपेक्षाही या बाजारातील मेंढ्याच्या किंमती अधिक आहेत. माणदेशातील उंच नाकाच्या, वेगवेगळ्या रंगाच्या छाप असलेल्या, उंचपु-या माडग्याळ जातीच्या बकऱ्यांच्या किंमती पाहून चक्रावून जायला होतंय. या बक-या दीड लाखापासून ते 74 लाखापर्यंत आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या शेळ्या मेंढ्याच्या बाजारात कोट्यावधी (Crore rupees) रुपयाची उलाढाल होते.

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

कसा आहे प्रतिसाद? 

सांगली येथे आटपाडी परिसरात उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक शेळ्या मेंढ्यांच्या यात्रेत तब्बल पन्नास लाख रूपयांच्या बकऱ्यांची बोली लागते आहे. पाच हजारापासून ते चाळीस लाखांपर्यंत या बोल्या लागत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी उत्तरेश्वर (uttareshwar mandir) देवाच्या यात्रेनिमित्त हा बाजार भरला आहे. त्यातून हा बाजार सातारा, सांगलीसह, सोलापूर, कोल्हापूर येथूनही मोठे व्यापारी येथे येतात. 

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

व्यापारी उत्साहात, आनंदात 

करोनानंतर (corona) ही यात्रा सगळ्यांचाच उत्साह वाढवते आहे. शेतकरी पशुपालकही या यात्रेत आपला व्यापार करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राबाहेरीलही अनेक व्यापारी आणि पशुपालक या यात्रेला भेट देत आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत नक्कीच लाखो रूपयांची उलाढाल होणार आहे. हा व्यापार दिवसभर बराच वेळ चालतो. यापुर्वीही अशा यात्रा भरल्या आहेत. त्यामुळे व्यापारांचा उत्साह कायमच वर राहिलेला आहे. सध्या दुष्काळामुळे शेळ्या -मेंढ्याही मरणं पावताना दिसत आहेत. त्यातून कोविडमुळेही या व्यापाराल खीळ बसली होती परंतु आता मात्र व्यापार सुरू झाल्यानं सगळीकडे नवचैतन्य पसरलं आहे.