पुणेकरांनो तर धरणात पाण्याचा एकही थेंब शिल्लक रहाणार नाही

पुणेकरांवर पाण्याचं संकट

Updated: Dec 6, 2018, 08:14 PM IST
पुणेकरांनो तर धरणात पाण्याचा एकही थेंब शिल्लक रहाणार नाही title=

पुणे : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. पुणेकरांनो पाण्याचा काटकसरीनं वापर करा असे संकेत पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत. यावर्षी पुण्यातील धरणातील पाणीसाठा २० टक्क्यांनी कमी आहे. हा पाणीसाठा शेवटचे तीन महिने पुरवायचा असल्यास दहा दिवसातून एकदा पुण्याचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. सध्या शहराला १ हजार ३५० एमएलडी पाणीपुरवठा होतो आहे. हा पाणीपुरवठा असाच सुरु राहिल्यास शेवटच्या तीन महिन्यात धरणात पाण्याचा एकही थेंब शिल्लक रहाणार नाही असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन त्यांनी पुणेकराना केलं. 

अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय गरज भसल्यास बांधकामासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यावर बंधन आणलं जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.