Gautami Patil Viral Video : महाराष्ट्राला आपल्या नृत्याने वेड लावणाऱ्या गौतमीची (Gautami Patil) तो अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला होता. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली होती. अखेर पुणे पोलिसांनी (Pune Police) एका व्यक्तीला नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. तपासामध्ये या व्यक्तीकडून धक्कादायक माहिती समोर येतं आहे. (Crime News)
गौतमी पाटील हिचा कपडे बदलताना कोणी तरी व्हिडीओ काढला त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर गौतमी पाटीलला धक्का बसला होता. त्यानंतर कोण आहे हा व्यक्ती हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं. पुणे पोलिसांनीही या व्यक्तीच्या शोधात कंबर कसली होती. अखेर त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड अका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. तो फक्त 17 वर्षांचा आहे. त्याने इन्स्टाग्रामवर गौतमीच्या नावाने फेक अकाऊंट (Instagram fake account) उघडलं होतं. त्यावरुन तो गौतमी पाटीलचे फोटो व्हायरल करत होता. (gautami patil viral video minor arrested shocking revelation pune police )
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो अल्पवयीन मुलगा तो मोबाईल वापर होता, त्यातील सिम कार्ड हे त्याच्या आईच्या नावावर आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचा आई वडिलांना हजर होण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान याप्रकरणात पोलिसांनी साताऱ्यातून अजून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात विनयभंग आणि आयटी अॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे. साताऱ्यातील भरतगाव वाडीमधून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या तिघांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. दरम्यान गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडीओ यवत मधील कार्यक्रमात काढल्याचा संशय पोलिसांना आहे.
दरम्यान आरोपी पकडल्या गेल्याचा आनंद आहे पण समाजात असे अजून अनेक जण आहे ज्यांना समज देणं गरजेचं आहे, असं गौतमी पाटील हिने व्यक्त केलं आहे.
गौतमी पाटील लवकरच 'घुंगरू' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान तमाशा कलावंतांनी गौतमी पाटील करत असलेल्या नृत्याला लावणी म्हणण्यावर आक्षेप घेतला आहे. त्यावर अखेर गौतमीने उत्तर दिलं आहे. ती म्हणाली की, ''ती पूर्णपणे लावणी करतच नाही तो लावणीचा कार्यक्रम नसून तो एक डीजे शो आहे.''