ठाण्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू

ठाण्याच्या आंबेडकर रस्त्यालगत असलेल्या एका घरात सिलेंडरचा स्फोट

Updated: Dec 25, 2018, 02:10 PM IST
ठाण्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू title=

ठाणे : ठाण्यातील एका घरामध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर चौघे जण जखमी झाल्याची घटना घडलीय. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

ठाण्याच्या आंबेडकर रस्त्यालगत असलेल्या एका घरात सिलेंडरचा स्फोट झालाय. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर चौघे जण जखमी झालेत. कांतीबाई वानखेडे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. संदीप काकडे, हिमांशू काकडे, वंदना काकडे, लतिका काकडे ही जखमी व्यक्तींची नावं असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.