'साक्षगंध' आटोपून निघालेल्या गाडीचा अपघात, एकाच कुटुंबातील नऊ जण जागीच ठार

कळंब भागात राहणाऱ्या पिसे कुटुंबातील नितीन पिसे याचा विवाह यवतमाळच्या कांबळे कुटुंबात ठरला होता

Updated: Dec 25, 2018, 11:37 AM IST
'साक्षगंध' आटोपून निघालेल्या गाडीचा अपघात, एकाच कुटुंबातील नऊ जण जागीच ठार title=

यवतमाळ : यवतमाळच्या कळंब तालुक्यात चापर्डा गावाजवळ ट्रक आणि क्रुझरमध्ये भीषण अपघात होऊन ९ जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. ते कळंबच्या पार्डी येथील रहिवासी आहेत. सोमवारी रात्री ९ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडलीय. 

साक्षगंध कार्यक्रमासाठी हे कुटुंबीय यवतमाळ येथे आले होते. कार्यक्रम आटोपून पिसे परिवार कळंबकडे परतत होतं. यावेळी क्रुझरला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ९ जण ठारे झाले असून सहा जण गंभीररित्या जखमी झालेत. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. जखमींना कळंब ग्रामीण रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केलंय. या घटनेनंतर पार्डी गावावर शोककळा पसरलीय. 

मिळालेल्या माहितीनुसार, कळंब भागात राहणाऱ्या पिसे कुटुंबातील नितीन पिसे याचा विवाह यवतमाळच्या कांबळे कुटुंबात ठरला होता. सोमवारी संपूर्ण कुटुंब साक्षगंध कार्यक्रमासाठी नियोजित वधूच्या घरी दाखल झालं होतं... कार्यक्रमही योग्य रितीनं पार पडला. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. हे कुटुंब आपल्या घरी परतत असताना नागपूरहून यवतमाळला जाणाऱ्या एका भरधाव ट्रकनं एसयूव्हीला धडक दिली. 


एसयूव्हीचा अपघात

हा अपघात इतका भीषण होता की एसयूव्हीचे अक्षरश: तुकडे झाले. यात नऊ जणांनी जागेवरच अखेरचा श्वास घेतला... तर सहा जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृतांमध्ये ३२ वर्षीय सोनाली शैलेश बोडाडे आणि ५२ वर्षीय रमेश सूथल यांचाही समावेश आहे.