नाशिक : मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेसमध्ये लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात आलीय. गेल्या २२ वर्षांपासून सर्वधर्मीय चाकरमानी गुण्यागोविंदाने गोदावरी एक्प्रेसमध्ये गणेशोत्सव साजरा करतात. यावर्षीही गणरायाची वाजतगाजत मिरवणूक काढून गाडीत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मनमाड, नाशिकमधून या गाडीने अनेक प्रवासी रोज मुंबईत रोजगारासाठी येतात. सणाच्या दिवशीही सुट्टी नसलेल्यांची संख्या बरीच मोठी आहे. त्यांनाही गणेशोत्सवाचा आनंद मिळावा म्हणून पासधारकांच्या बोगीत हा गणपती बसवण्याची प्रथा सुरू झाली. मनमाडला गाडी सुटल्यावर आणि संध्याकाळी परतीच्या प्रवासात नाशिकला आरती करण्यात येते.