फेसबुकच्या प्रोफाईलवर सुंदर सुंदर फोटो ठेवणाऱ्यांनो सावधान! मुली आणि महिलांच्या फोटोंवर नजर

  फेसबुकवर अपलोड केलेल्या सुंदर मुलींचे फोटो वापरुन बनावट प्रोफाईल तयार करण्याचे प्रकार वाढीस लागलेत. तसंच मुलींचे हे प्रोफाईल फोटो विवाह संकेतस्थळावर अपलोड केले जातात.  

Updated: Dec 5, 2022, 09:01 PM IST
फेसबुकच्या प्रोफाईलवर सुंदर सुंदर फोटो ठेवणाऱ्यांनो सावधान! मुली आणि महिलांच्या फोटोंवर नजर title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : फेसबुकच्या प्रोफाईलवर(Facebook profile) सुंदर सुंदर फोटो ठेवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुली आणि महिलांच्या फोटोवर सायबर गुन्हेगार(Fraud) नजर ठेवून आहेत.  फेसबुकवर अपलोड केलेल्या सुंदर मुलींचे फोटो वापरुन बनावट प्रोफाईल तयार करण्याचे प्रकार वाढीस लागलेत. तसंच मुलींचे हे प्रोफाईल फोटो विवाह संकेतस्थळावर अपलोड केले जातात.  मग लग्नासाठी इच्छुक मुलांना जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. नागपूर(Nagpur) विभागाच्या सायबर सेलमध्ये याचसंदर्भातल्या रोज दोन तक्रारी येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी फेसबुक अकाऊंट सुरक्षित करण्याचा सल्ला दिला आहे. 

नागपुरात सायबर पोलीस विभागाकडे रोज दोन तक्रारी अशाच आशयाच्या येत आहे. ज्यामध्ये फेक प्रोफाइल तयार करणाऱ्या काही साईट तयार करून रजिष्ट्रेशन करण्यासाठी पैसे घेतले जातात. एखाद स्थळ पसंतीस आल की त्या प्रोफाईलच्या मुलीएवजी कॉल सेंटर प्रमाणे मुलींशी बोलणी करून देतात. त्यामुळे अशा साईट पासून सावध राहण्याचा सल्ला सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिला आहे. 

सायबर गुन्हेगार सध्या नवं नवीन शक्कल लढवत फसवणूक आणि पैशे उकळण्याच्या घटना वाढत असल्याने यापासून बचाव करता येतो. त्यासाठी आपल्या फेसबुक प्रोफाइलच्या अकाउंटवर काही बेसिक सेटिंग करून पब्लीक ऐवजी प्रायव्हेट करून ओळखी व्यक्तीपासून बचाव करता येते. तसेच अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका असा सल्लाही सायबर पोलीस देतात. कोणी फेसबुक अकाऊंट हॅक करू नये यासाठी एक खास सेटिंग करणे देखीव गरजेचे आहे. 

सध्या तरुण मुला मुलींना आपले फोटो सोशल मीडियावरील अनेक अकाऊंटवर शेअर करण्याचे वेड लागले आहे. पण याच फोटोवर सायबर गुन्हेगार नजर ठेवून असतात. त्यामुळे भविष्यातील अडचणीत अकडण्यापेक्षा सायबर पोलिसांच्या सल्ल्यानुसार प्रोफाइलवर काही बेसिक बदल केल्यास धोका टाळता येऊ शकतो.