मुंबई-पुणे एक्स्प्रेस अपघातात चार ठार, दोघांची प्रकृती चिंताजनक

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रसायनीजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जण ठार झाले आहेत.  

Updated: Nov 29, 2019, 09:46 AM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेस अपघातात चार ठार, दोघांची प्रकृती चिंताजनक title=
रसायनी येथे कारचा झालेला चेंदामेंदा.

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रसायनीजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जण ठार झाले आहेत. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारने टँकरला मागून जोरदार धडक दिली. यात कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

अपघातग्रस्त कार सातारा येथून लग्न समारंभ आटोपून मुंबईकडे परतत होती. अपघात एवढा भीषण होत की अपघातग्रस्त कारचा चेंदामेंदा झाला आहे. ही कार अतीवेगाने चालविण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे गाडीवर नियंत्रण मिळवता आले नसल्याचे या अपघातानंतर सांगण्यात येत आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.