सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल

सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १० पेक्षा जास्त लोकांविरोधात गुन्हे दाखल आहेत. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Updated: Dec 12, 2017, 10:23 PM IST
सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल title=

मुंबई : सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १० पेक्षा जास्त लोकांविरोधात गुन्हे दाखल आहेत. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

गृह खात्याच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केलीय. तत्कालिन अभियंते, विभागीय लेखा अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याविरोधात हे गुन्हे नोंदवण्यात आलेत. मोखाबर्डी उपसा सिंचन, गोसीखुर्द डावा कालवा, वडाला शाखा कालवा आणि गोसीखुर्द उजवा कालवा या चार सिंचन प्रकल्पांच्या कामात अनियमितता, भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामं केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.