ऑक्सिजनअभावी चार कोरोना बाधितांचा मृत्यू, रुग्णालयाबाहेर गर्दी आणि मोठा पोलीस फौजफाटा

धक्कादायक घटना घडली आहे. वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात (Vedant Hospital)चार कोरोना (Coronavirus) रुग्णांचा मृत्यू झाल्याने तणावाची स्थिती झाला आहे.  

Updated: Apr 26, 2021, 02:58 PM IST
ऑक्सिजनअभावी चार कोरोना बाधितांचा मृत्यू, रुग्णालयाबाहेर गर्दी आणि मोठा पोलीस फौजफाटा  title=
संग्रहित फोटो

ठाणे : येथे धक्कादायक घटना घडली आहे. वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात (Vedant Hospital) चार कोरोना (Coronavirus) रुग्णांचा मृत्यू झाल्याने तणावाची स्थिती झाला आहे. ऑक्सिजन ( oxygen )न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हे माहिती वाऱ्यासारखी पसल्याने रुग्णांचे नातेवाईक आणि राजकीय लोकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे येथे तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या मृत्यूबाबत रुग्णालयाने  अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. (Four Covid Patients Death due to lack of oxygen in Vedant Hospital at Thane)

ठाण्यातील वर्तकनगर येथील खासगी कोविड या वेदांत रुगणालायत चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ऑक्सिजन न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असताना दुसरीकडे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन प्रशासनाला योग्य ती कारवाई आणि चौकशीची करण्याची मागणी केली आहे. रुग्ण हे अत्यवस्थ होते असे डावखरे याना रुग्णालय यांनी कळवले आहे. दरम्यानन, कोरोना (Coronavirus) रुग्णांपैकी अरुण शेलार (51), करुणा पाष्ठे (67), विजय पाटील (57),  दिनेश पाटणकर (41)  या चार जाणांचा मृत्यू झाला.

रुग्णालयाबाहेर नातेवाईक आणि मनसे तसेच भाजप पक्षाचे पदाधिकारी जमले असून रुग्णालय बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रुग्णालयात 50 च्यावर रुग्ण दाखल असून चौघांचा मृत्यू झाला असल्याचे सांगत पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, यामागे वेगळे काही कारण असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.  

वेदांत रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी आहे. ऑक्सिजनअभावी मृत्यू झाले, यामागे रुग्णालय दोषी आहे की महापालिका प्रशासन यासंदर्भातील जिल्हाधाऱ्यांची भेट घेत आहोत. यासंबंधी सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यानंतर दोषी यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. ठाण्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना अशा प्रकारची घटना निषेधार्ह आहे. ज्यांचं निधन झालं आहे त्यांच्या नातेवाईकांकडून बिल घेतलं जाऊ नये अशी भूमिका आम्ही घेतली आहे, निरंजन डावखरे यांनी घेतली आहे.
 
दरम्यान, रुग्णालयाबाहेर नातेवाईकांसोबत मनसे आणि भाजपाचे पदाधिकारी जमल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाजपसोबत मनसेकडूनही या मृत्यूबाबतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.