नाशिक : नाशिकचं एकेकाळचं नाव होतं गुलशनाबाद ...फुलांचं शहर म्हणून ओळख होती. त्याचा प्रत्यय आजही येतो. ही धार्मिक नगरी, पर्यटन नगरी आहे तशीच फुलांचीही नगरीही आहे, असं म्हटल्यास अतिशियोक्ती ठरणार नाही.
या जिल्ह्यात सह्याद्रीच्या शिखरावर सध्या अनेक ठिकाणी कास पठारे फुललेली आहेत. इगतपुरी, घोटी परिसरात निसर्गाचं सुंदर रुप पहायला मिळतंय. कसारा घाट, हरिहर गड, अंजनेरी तसेच इतर गड किल्ल्यांवर विविधरंगी फुलांचा साज पहायला मिळतोय.
त्र्यंबकेश्वर परिसरात ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजूला पिवळ्या-नारिंगी फुलांच्या बागा दिसतायेत. एकेकाळचं फुलांचं गाव वास्तवात आल्याचं चित्र त्र्यंबकेश्वर परिसरातील भागात पहायला मिळतंय. डोंगरांनी रंगीबेरंगी चादर पांघरल्याचा भास होतोय. बेळगाव ढगा या शिवारात असलेली काही रानफुलांची नयनरम्य सफर पाहा व्हिडीओतून...