अनिरुद्ध दवाळे, अमरावती : Rain In Amravati : राज्यात सर्वत्र धो धो पाऊस कोसळत आहे. अमरावती जिल्ह्यातही असाच पाऊस कोसळत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पुलावरुन पाणी वाहत असताना ट्रॅक्टर पाण्यात घालणे जीवावर बेतले. ट्रॅक्टरसह पाच जण गेले वाहून गेलेत. दरम्यान, यातील दोन जण सुखरुप पुरातून बाहेर पडले. मात्र, तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. या तिघांचा शोध सुरु आहे. (Tractor with Five people swept away by Flooded River)
अमरावती जिल्ह्यात काल सकाळपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला आहे. नदीवरील पाणी वाहत असताना देखील नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर घालने चांगलेच जीवावर बेतले आहे. पाण्याला ओढा असल्याने ट्रॅक्टर नदीत पलटी होऊन पाच जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नदीपात्रात घडली.
पाच जण वाहून गेलेल्यांपैकी दोन जण परत आले असून तिघे जण अद्यापही बेपत्ता आहे. दरम्यान त्यांचा आता शोध घेणे सुरु आहे. तर दुसरीकडे मेळघाटमधील तापी नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे तापी नदी सध्या दुथडी भरुन वाहत आहे. तर नदी काठीला गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.