पंचगंगा नदी चोरीला, तक्रार ऐकून पोलिसही अवाक

पंचगंगा नदी चोरीला

Updated: Jun 12, 2018, 09:15 AM IST

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या बचावासाठी आता अनोखी शक्कल लढवण्यात येते आहे. पंचगंगा नदी चोरीला गेल्याचा गुन्हा नोंदवण्यासाठी चक्क मच्छिमार हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झाले. मच्छिमारांच्या या अजब तक्रारीचा विषय ऐकून पोलीस ठाण्यातील कर्मचारीही अवाक झाले. यावेळी 20 ते 25 मच्छीमारांनी मासे पकडण्यासाठी लागणारं साहित्य हातात घेऊन पोलीस स्थानकात हजेरी लावली. नदीपात्रात केंदाळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने मच्छिमार संतप्त झाले आणि थेट असं अनोखं आंदोलन करत आपली नाराजी व्यक्त केली.