पोलिसांवर गोळीबार केल्याच्या घटनेमुऴे खळबळ

नागपुरात एका गुंडाने पोलिसांवर गोळीबार केल्याच्या घटनेमुऴे खळबळ उडाली आहे.

Jaywant Patil Updated: Mar 25, 2018, 12:56 AM IST
पोलिसांवर गोळीबार केल्याच्या घटनेमुऴे खळबळ title=

नागपूर : नागपुरात एका गुंडाने पोलिसांवर गोळीबार केल्याच्या घटनेमुऴे खळबळ उडाली आहे. नितेश चौधरी असे गोळीबार करणा-या गुंडाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.  देशी कट्टा हातात घेवून गुंड नितेश चौधरी लालगंज परिसरात दहशत पसरवत असतानांचे सीसीटीव्ही फुटेज झी मीडियाला मिळाले आहे. 

देशी कट्टा दाखवत गोळीबार

शहरात 15 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेला गुंड नितेश चौधरी परिसरातील नागरिकांना देशी कट्टा दाखवत धमकवत होता. याबाबत  माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्याला पकडायला जाताच त्याने पोलिसांवर देशी कट्टातून गोळीबार केला.