पनवेलमध्ये टायरच्या गोदामाला भीषण आग

पनवेलमध्ये जुन्या टायरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 26, 2017, 03:32 PM IST
पनवेलमध्ये टायरच्या गोदामाला भीषण आग title=

पनवेल : पनवेलमध्ये जुन्या टायरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

अग्निशमन दलाच्या ७ गाड्या आणि २० टँकर्स घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत.

पनवेलमधील धानसर गावात असलेल्या टायरच्या गोदामाला ही आग लागली आहे.

या गोदामाच्या जवळपास धान्याची गोदामं आहेत. धान्याच्या गोदामालाही आग लागली होती मात्र, ती विझविण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.