शेतकऱ्यांचं खत अनुदान व्यापारीच लुटतायत, खत खरेदीनंतरचा मेसेज नीट तपासून पाहा !

राज्यभरातल्या शेतक-यांना सावध करणारी बातमी आहे. 

Updated: Jun 2, 2021, 10:04 PM IST
शेतकऱ्यांचं खत अनुदान व्यापारीच लुटतायत, खत खरेदीनंतरचा मेसेज नीट तपासून पाहा ! title=

प्रशांत परदेशी, झी २४ तास, धुळे :  राज्यभरातल्या शेतक-यांना सावध करणारी बातमी आहे. खत विक्रेते शेतक-यांच्या नावावर सरकारलाच चुना लावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. धुळ्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. नक्की संपूर्ण प्रकरण काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. (Fertilizer subsidy of farmers is being looted by traders in Dhule)

खत सबसिडीत महाघोटाळा 

धुळे तालुक्यातल्या निमडाळे गावातले शेतकरी शरद पाटील यांनी धुळ्यातल्या विक्रेत्याकडून खताची एकच पिशवी घेतली. खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना मोबाईलवर मेसेज आला. तो मेसेज पाहून त्यांना धक्काच बसला. खताची केवळ एकच पिशवी घेतली असताना शरद पाटील यांना ४५ बॅग घेतल्याचा मेसेज आला. या एकूण 45 बॅगची बिलाची रक्कम ही 43 हजार 590 इतकी होती आणि यावर एकूण 21 हजार 720 रुपयांचं अनुदान मिळाल्याचा उल्लेख होता. 

पाटील यांनी संबंधित दुकानदाराकडे या सर्व प्रकरणाची चौकशी केली. त्या दुकानदाराला जाब विचारला. मात्र, चौकशी केल्यावर दुकानदारानं उडवाउडीवीची उत्तरं दिली. दुकानादाराने पाटील यांना परत पाठवलं. त्यामुळे पाटील यांना या प्रकरणात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला. या घोळाबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार करण्यात आलीये. या प्रकरणी कृषी विभागाने चौकशीची आदेश दिले आहेत... 

हे हिमनगाचं एक टोक असू शकतं. राज्यात अनेक ठिकाणी असं घडत असेल. तुमच्या नावावर बनावट बिलं तयार करुन कोट्यवधींचं अनुदान लाटलं जात असेल. त्यामुळे शेतक-यांनो खत खरेदी केल्यावर बिल तपासून पाहा. काही गडबड वाटली तर दुकानदाराला जाब विचारा, असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.  

संबंधित बातम्या :

मेट्रोची झिरो माईल ते कस्तुरचंद पार्क स्टेशनपर्यंत यशस्वी ट्रायल रन

भेटी लागी जीवा | यंदा आषाढीवारी निघणार की यंदाही खंडीत होणार?