नरबळी प्रकरणाचा धक्कादायक उलगडा, आईमुळेच गमवावा मुलाला लागला जीव

साडे पाच वर्षांच्या मुलाचा हळद, कुंकू लावलेला मृतदेह घराबाहेर सापडला

Updated: Oct 7, 2021, 03:11 PM IST
नरबळी प्रकरणाचा धक्कादायक उलगडा, आईमुळेच गमवावा मुलाला लागला जीव  title=

कोल्हापूर :  महाराष्ट्राला हादरवणारी घटना कोल्हापुरात घडली होती. साडे पाच वर्षीय मुलाचा नरबळी देण्यात आल्याचं सांगण्यात आला होता. या घटनेनं सपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. साडे पाच मुलाचं अपहरण करून त्याचा नरबळी देण्यात आल्याच सांगण्यात आलं होतं. 

नरबळीचा बनाव करून बापानेच चिमुकल्या आरवचा खून केल्याचं समोर आला आहे. कोल्हापूरमधल्या कापशीमध्ये दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. साडे पाच वर्षांच्या आरवचा घरामागे हळद कुंकू टाकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलिसांच्या तपासाची दिशा भरकटवण्यासाठी बापानंच नरबळीचा बनाव केला होता.

पोलिसांनी निर्दयी राकेश केसरेला अटक केली आहे. विशेष म्हणजे राकेशनंच मुलगा आरवचं अपहरण झाल्याची तक्रार केली होती. पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे मुलगा आपला नाही असा राग मनात धरून बापाने निरपराध आरवचा खून केला.  

जालन्यात गुप्तधनासाठी पत्नीचाच नरबळी देण्याचा प्रयत्न 

जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी याठिकाणी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने गुप्तधन मिळवण्यासाठी आपल्या पत्नीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला आहे. पण पीडितेनं वेळीच प्रसंगावधान दाखवत पतीचा विरोध केल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीसह एका व्यक्तीला आणि मांत्रिक महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.