राज ठाकरे यांच्या भगव्या शालीवरून फडणवीस म्हणाले...

राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही बाहेर काढणार आहोत. आजपासून त्याची सुरवात मुंबईतून झालीय

Updated: Apr 19, 2022, 04:37 PM IST
राज ठाकरे यांच्या भगव्या शालीवरून फडणवीस म्हणाले... title=

पुणे : राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही बाहेर काढणार आहोत. आजपासून त्याची सुरवात मुंबईतून झालीय. आज पहिल्याच दिवशी झालेल्या सभेनंतर हे सगळे हादरले आहेत. त्यामुळे हलला होण्यास प्रकार घडले, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शंतनू गुप्ता लिखित मल्हार पांडे अनुवादित 'भाजप : काल, आज आणि उद्या' या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भाजपच्या पोलखोल यात्रेवर हल्ला होणे हे अपेक्षित आहे. कारण आम्ही पोलाखोल करत आहोत. पण, कितीही हल्ले झाले तरी ही यात्रा थांबणार नाही.  राज्य सरकारची पोलखोल करतच राहू असा इशाराही त्यांनी दिला. 

शंतनू गुप्ता हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. १५, २० वर्षांपूर्वी त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्याचा मराठी अनुवाद आता झालाय. या पुस्तकात खरं हिंदुत्व कुणाच्या रक्तात आहे हे लिहिलंय. त्यामुळे मी कुणाला बोललोय हे लक्षात येईलच असा टोला त्यांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला.

यावरी पत्रकारांनी फडणवीस यांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले, राज ठाकरे यांच्याबाबत तुम्ही रोज तेच तेच विचारता आणि एकदाच दाखवता त्यामुळे नवीन काही बोलण्यासारखं नाही. राज ठाकरे यांनी घेतलेली भगवी शाल नेमकी कोणती हे येणार काळ ठरवेल असेही फडणवीस म्हणाले.