Fact Check : जीवघेणा स्टंट, जीवावर बेतला

बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. आज आम्ही असा व्हिडिओ दाखवणार आहोत तो व्हिडिओ पाहा आणि तुमच्या मुलांना समज द्या.  

Updated: Jul 15, 2022, 12:02 AM IST
Fact Check : जीवघेणा स्टंट, जीवावर बेतला title=

पुणे : बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. आज आम्ही असा व्हिडिओ दाखवणार आहोत तो व्हिडिओ पाहा आणि तुमच्या मुलांना समज द्या. कारण, आई-वडिलांची नजर चुकवून मुलांची जीवघेणी स्टंटबाजी सुरूये. या व्हिडिओत तुमच्या ओळखीचा कुणी नाहीये ना? काय आहे हा स्टंट चला पाहुयात. (fact check viral polkhol young boys dive in flood water in maharashtra sangali)

पोहण्यासाठी पुराच्या पाण्यात उडी मारली पण ही उडी या तरुणाची शेवटची उडी ठरली.  पूर आला होता, सगळेजण व्हिडिओ बनवत होते. त्यावेळी या तरुणानं पुलावरून पुरात उडी मारली.

आता पुन्हा एकदा पाहा. याचं वय 23 आणि पुलाची उंची 25 फूट. पण, या वयातही यानं एवढ्या उंचीवरून उडी मारण्याचं धाडस केलं आणि हा चांगलाच आपटला तो पुन्हा दिसलाच नाही. पुरात नदीनं रौद्ररुप धारण केलेलं असताना पुलावर थांबण्याचंही कुणाचं धाडस होणार नाही. पण, यानं जीव धोक्यात घालून पुलावरून उडी मारलीच. मालेगावच्या गिरणा नदीत हा जीवघेणा स्टंट केलाय.

तर दुसरीकडे सांगलीत कृष्णा नदीत पोहण्यासाठी उड्या पडतायत. आयर्विन पुलावरून उडी मारतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. बघा, किती खोल ही नदी आहे. तरीदेखील जीवाची पर्वा न करता यानं थेट नदीत उडी मारली.

पुराच्या पाण्यात अनेकजण पोहण्याचं धाडस करतात. सोशल मीडियावर चमकण्यासाठी उडी मारतानाचे स्टंट व्हिडिओ स्टंट बनवतात. मात्र, स्टंट फसला तर थेट मृत्यूशी गाठ. त्यामुळे या स्टंटबाजांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा.