राष्ट्रवादी कुणाची? निकालाआधीच शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का

आमदार, खासदारांच्या संख्येनुसार पक्ष आणि चिन्ह द्या अशी मागणी अजित पवार गटाने आयोगासमोर शिवसेनेचा दाखला देत केली आहे. तर, अंतिम निर्णय येईपर्यंत चिन्ह गोठवू नका अशी मागणी शरद पवारांनी आयोगाकडे केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 6, 2023, 08:15 PM IST
राष्ट्रवादी कुणाची? निकालाआधीच शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का title=

sharad pawar vs ajit pawar : राष्ट्रवादी कुणाची या कायदेशीर वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. अजित पवार गटानं पहिल्या दिवशी बाजू मांडली.  अजित पवार गटाने मांडलेल्या युक्तीवादावर शरद पवार गटावर टोकाचे आक्षेप नोंदवले आहेत. निकालाआधीच शपर पवार गटाला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का दिला आहे. शपथपत्र बोगस असल्याचे शरद पवारांचे आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळले आहेत. 

अजित पवारांनी मृत व्यक्तीचे शपथपत्र जोडल्याचा शरद पवार गटाचा दावा

अजित पवारांनी मृत व्यक्तीचे शपथपत्र जोडल्याचा दावा शरद पवार गटानं केला होता. यावर मृत व्यक्तीचे नव्हे तर त्यांच्या मुलाचे शपथपत्र जोडल्याचे अजित पवारांच्या वकीलांनी स्पष्ट केले. शपथपत्र बोगस नसल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवारांचा आक्षेप फेटाळला आहे. निवडणूक आयोगाने घेतलेली ही भूमिका शरद पवार गटासाठी मोठा झटका मानली जात आहे. 

पहिल्या सुनावणीत नेमकं काय झाल?

राष्ट्रवादी कुणाची वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. पहिल्या सुनावणीत अजित पवार गटानं आपली बाजू मांडली तर शरद पवार गटाकडून अजित गटाच्या युक्तिवादावर प्रतिवाद करण्यात आला. विशेष म्हणजे सुनावणीदरम्यान खुद्द शरद पवार निवडणूक आयोगासमोर उपस्थित होते. या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार गटावर धक्कादायक आरोप करण्यात आले.  

पुढची सुनावणी आता 9 ऑक्टोबरला

सुनावणीदरम्यान अजित पवार गटानं शरद पवार गटावर टोकाचे आक्षेप नोंदवले. आता राष्ट्रवादी कुणाची या वादावर पुढची सुनावणी आता 9 ऑक्टोबरला होणार आहे. शिवसेना कुणाची हा संघर्ष वर्षभर महाराष्ट्रानं पाहिला. शिवसेना कुणाची सुनावणीदरम्यान शिवसेना नाव आणि चिन्हं गोठवलं गेलं. तशाच पद्धतीची कारवाई राष्ट्रवादीच्या बाबतीतही होणार का याची चर्चा सुरु झालीय.

निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटाने काय वाद-प्रतिवाद केल

  • शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, पक्षाच्या घटनेचं पालन व्यवस्थित होत नाही 
  • पवारांचे निर्णय डावलता येणार नाहीत 
  • राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा गेला, त्यामुळे आमदारांची संख्या महत्त्वाची 
  • 9 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी पत्र दिलंय  
  • आमच्याकडे 53 पैकी 42 विधानसभेचे आमदार
  • एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमच्याकडे 
  • संख्याबळाप्रमाणे पदाधिकारी नियुक्तीचे अधिकार 
  • २४ राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा आम्हाला पाठिंबा 
  • मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्यासोबत 
  • प्रतोद अनिल पाटलांची नियुक्ती आमचीच 
  • केवळ एका पत्राद्वारे पक्षात नियुक्त्या कशा होऊ शकतात? 
  • शरद पवारांची निवड घटनेला धरुन, त्यामुळे पवारच राष्ट्रीय अध्यक्ष 
  • शिवसेना प्रकरणात संख्याबळ जास्त त्याला पक्ष, चिन्ह 
  • अंतिम निर्णयापर्यंत चिन्ह गोठवू नका