बा गजानना! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात 'या' दिवसापासून प्रवेशबंदी

वाचा महत्त्वाचं वृत्त....

Updated: Jul 9, 2020, 07:54 PM IST
बा गजानना! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात 'या' दिवसापासून प्रवेशबंदी  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामागोमाग अर्थातच गणेशोत्सवाची धूमही अनेकांनाच खुणावत आहे. पण, यंदा मात्र या उत्सही उत्सवावर सावट आहे, ते म्हणजे Corona virus कोरोना व्हायरसचं. 

मोठ्या संख्येनं दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणची वाट धरणाऱ्या चाकरमानी वर्गापुढं आता एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. कारण, ७ ऑगस्ट २०२०ला रात्री बारा वाजल्यानंतर पुढे कोणाही बाहेरच्या व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. रात्री बारा वाजेपर्यंतच गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश मिळणार आहे. शिवाय जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी ई- पास अनिवार्य असणार आहे. 

इतर भागांतून जिल्ह्यात येणाऱ्यांना रितसरपणे क्वारंटाईनही व्हावं लागणारम आहे. त्यासाठी योग्य ती व्यवस्था करुनच नागरिकांनी पुढील निर्णय घेण्याचं सांगण्यात येत आहे. विलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे. शिवाय गणपतीच्या मूर्तींची उंची, गणेशोत्सवासाठीच्या खरेदीचे नियम, मिरवणुकांवरील निर्बंधस असे अनेक नियम आणि निर्णय जिल्हा मुख्यालयातील बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

 

शक्य त्या सर्व परिंनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि सोबतच उत्सवाला कुठेही गालबोट लागणार नाही, यासाठीच हे नियम आखण्यात आले आहेत. त्यामुळं गणेशोत्सवानिमित्त कोकणात आणि विशेष म्हणजे सिंधुदुर्गात जाण्याच्या विचारात असाल, तर त्याची आखणी आतापासून करणंच फायद्याचं ठरेल.