रत्नागिरी : एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा (Elgar and Koregaon Bhima ) हे दोन वेगळे विषय आहेत. कोरेगाव भीमाचा तपास केंद्र सरकारकडे दिलेला नाही आणि देणार नाही. दलितांवर अन्याय होऊ देणार नाही, असे माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली.
एल्गार परिषदप्रकरणी सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. पुणे पोलिसांच्या भूमिकेवरच शरद पवारांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. पवारांकडून एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्याचसोबत स्वतंत्र तपास केल्यास सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणालेत.
#BreakingNews । एल्गार आणि कोरेगाव भीमा दोन वेगळे विषय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे । कोरेगाव भीमाचा तपास केंद्राक़डे देणार नाही । दलितांवर अन्याय होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरणhttps://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/60RvUdn1a5
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 18, 2020
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र एनआयए तपासाप्रकरणी सावध भूमिका घेतली आहे. एल्गार परिषदेबाबतचा तपास केंद्राने राज्याकडून काढून घेतला आहे. मात्र कोरेगाव भीमा दलित समाजाशी संबंधित आहे. दलित समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची एसआयटी चौकशी ( SIT) व्हावी म्हणून महाआघाडी सरकारकडे मागणी होत असताना हा तपास एनआयएकडे (NIA) सोपवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता होती. तसेच शरद पवारही एसआयटी चौकशीसाठी आग्रही आहेत. दरम्यान, केंद्राने हस्तक्षेप करत हा तपास काढून घेण्यासाठी प्रयत्न करत एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. याला मुख्यमंत्री ठाकरे यांचा हिरवा कंदिल असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे कोरेगाव भीमाचा तपास हा राज्याकडेच राहणार आहे. तर एल्गार परिषदेचा तपास हा केंद्राच्या एसआयटीकडे असणार आहे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.