पालघर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीची सत्ता

पालघर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली आहे.

Updated: Feb 18, 2020, 05:19 PM IST
पालघर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीची सत्ता title=

पालघर : पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. अध्यक्षपदी शिवसेनेच्या भारती कामडी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार निलेश सांबरे निवडून आले आहेत. पालघर जिल्हा परिषदेवर भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र येऊन सत्ता काबीज केली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांपैकी कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. 

शिवसेना १८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर राष्ट्रवादी १४, भाजप १२, माकप ५, बविआ ४, अपक्ष ३ तर काँग्रेस १ असे संख्याबळ आहे.

पालघर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची मुदत १५ फेब्रुवारी २०२० रोजी संपली होती. त्यानंतर आज नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यामुळे सत्तेचा मार्ग सोपा झाला. त्यामुळे राज्यानंतर आता महाविकासआघाडीचा पॅटर्न हळूहळू सगळ्य़ाच महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत आहे. 

राज्यात लवकरच अनेक महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी देखील अनेक महापालिकांमध्ये महाविकासआघाडी एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे.