Election results 2019 : माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी

माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचं वर्चस्व होत मात्र माढ्यात अखेर भाजपानेचं बाजी मारली आहे. 

Updated: May 23, 2019, 09:01 PM IST
Election results 2019 : माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी title=

माढा : माढा मतदारसंघातून भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचं वर्चस्व होत मात्र माढ्यात अखेर भाजपानेचं बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा दारुण पराभव करत रणजितसिंह यांनी हा विजय मिळवला आहे. २००९ च्या मतदारसंघ फेररचनेत पूर्वीचा पंढरपूर लोकसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला. पंढरपूर लोकसभा मतदारसंघ असताना १९७७ पासून १९९९ पर्यंत या  मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. अर्थात त्यामागे मोहिते पाटील घराण्याची मोठी ताकद होती. १९९९ ला शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर मोहिते पाटीलही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर रामदास आठवले १९९९ आणि २००४ असे दोन वेळा चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. २००९ ला विजयसिंह मोहिते पाटील माढ्यातून निवडणूक लढायला इच्छुक होते. मात्र राजकीय सत्ता संघर्षातून त्यांना माघार घ्यावी लागली आणि शरद पवार तीन लाख मताधिक्यानं निवडून आले. २०१४ ला मोदी लाटेचा अंदाज घेत शरद पवारांनी लोकसभा निवडणूक न लढवता राज्यसभेवर जाणं पसंत केलं. 

महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघातले निकाल

मुंबई

मुंबई उत्तर

मुंबई उत्तर-पश्चिम

मुंबई उत्तर-पूर्व

मुंबई उत्तर-मध्य

मुंबई दक्षिण-मध्य

दक्षिण मुंबई

कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रायगड

पालघर

भिवंडी

कल्याण

ठाणे

विदर्भ 

वर्धा

रामटेक

नागपूर

भंडारा-गोंदिया

गडचिरोली-चिमूर

चंद्रपूर

यवतमाळ-वाशीम

बुलडाणा

अकोला

अमरावती

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

सोलापूर

बारामती

सातारा 

सांगली

कोल्हापूर

हातकणंगले

मावळ

अहमदनगर

माढा

शिरुर

मराठवाडा

औरंगाबाद

जालना

हिंगोली

नांदेड

परभणी

बीड

उस्मानाबाद

लातूर

उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार

धुळे

दिंडोरी

नाशिक

शिर्डी

रावेर

जळगाव

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

उमेदवार

 पक्ष

 मतदान

विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी 489989
सदाभाऊ खोत स्वा. शे. संघटना 464645
प्रतापसिंग मोहित पाटील अपक्ष 25187
कुंदन बनसोडे बसपा 15790
नवनाथ पाटील हिंदुस्थान प्रजा पक्ष 8853