बुलडाणा : बुलडाण्यामध्ये शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांना मात दिली. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र युतीला विदर्भातल्या दोन जागा गमवाव्या लागल्या.
अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला आहे. शिवसेना-भाजप युतीने विदर्भातली गमावलेली ही दुसरी जागा आहे. याआधी चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला.
हंसराज अहिर हे केंद्रामध्ये राज्य मंत्री होते. याआधी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगडमधून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केला.
बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेने प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली होती. प्रतापराव जाधव यांचा सामना राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांच्याशी झाला. वंचित बहुजन आघाडीकडून बुलडाण्यामध्ये बळीराम सिरस्कर रिंगणात होते.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये बुलडाण्यातून शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या कृष्णराव इंगळेंचा १,५९,५७९ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
प्रतापराव जाधव | शिवसेना | ५,०९,१४५ |
कृष्णराव इंगळे | राष्ट्रवादी काँग्रेस | ३,४९,५६६ |
अब्दुल हफीज | बसपा | ३३,७८३ |
बाळासाहेब दराडे | अपक्ष | २९,७९३ |
नोटा | १०,५४६ |