सांगली,मिरज, कुपवाड महापालिकेत महापौर, उपमहापौरपदासाठी आज फैसला

महापौरपदी संगीता खोत तर उपमहापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांची वर्णी शक्य असल्याचे बोलले जाते.

Updated: Aug 20, 2018, 11:40 AM IST
सांगली,मिरज, कुपवाड महापालिकेत महापौर, उपमहापौरपदासाठी आज फैसला title=

सांगली: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाचा आज फैसला होणार आहे. महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खोत आणि सविता मदने तर काँग्रेसकडून वर्षा निंबाळकर मैदानात आहेत. 

भाजपचे नगरसेवक गोव्याला

उपमहापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी आणि पांडुरंग कोरे यांच्यापैकी एक आणि राष्ट्रवादीकडून स्वाती पारधी यांच्यात लढत होणार आहे. बहुमतात असलेल्या भाजपने आपल्या ४२ सदस्यांना गोव्याला पाठविले आहे. ते तेथून थेट मतदानासाठी दाखल होणार आहेत.

शक्य-अशक्यतांना उधान

महापौरपदी संगीता खोत तर उपमहापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांची वर्णी शक्य असल्याचे बोलले जाते.