मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम केला आहे. एकनाथ खडसे हे २३ ऑक्टोबरला मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भाजपा सोडण्याचा निर्णय घेतलानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी भूतकाळातीला काही प्रसंगाचे दाखले देत प्रखर मत मांडलं.
एकनाथ खडसे म्हणाले, मला पद न मिळाल्याचं दुख नाही, ताकदीन पद मिळालं, कुणाच्या उपकाराने पद नाही मिळालं नाही, भाजपावर आणि केंद्रीय नेतृत्वावर माझा रोष नाही. मी ४० वर्ष घराघरात भाजपा पोहोचवण्याचं काम केलं.
मला पद न मिळाल्याचं दु:ख नाही, माझं आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला गेला, माझ्यावर विनयभंगासारखा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. यात दोषी राहिलो असतो, तर ३ महिने माझे तरुंगात गेले असते, एवढ्या खालच्या स्तरावरचं राजकारण पक्षातल्या पक्षात केलं गेलं.
माझी नाराजी हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, मी भाजपा नाईलाजाने सोडत आहे. ४ वर्ष मला प्रचंड मानसिक त्रास दिला गेला. नाथाभाऊ हा टिंगल करण्याचा विषय केला गेला. माझी यूट्यूबवरची भाषणं ऐका, मी म्हटलंय, मला पक्षाबाहेर ढकलतायत असं मी म्हटलं आहे.
मी विधानसभेतही बोललो, आजही बोलतोय, माझा काय गुन्हा आहे ते आजंही सांगावं. मी लाचार नाही, मी कुणाचे पाय चाटत बसलेलो नाही, मी स्पष्ट बोलतो, एवढाच काय तो माझा गुन्हा असेल. भाजपासोडताना मला भाजपातून चंद्रकांतदादांशिवाय कुणाचाही फोन आला नाही.
यूट्यूबवर माझी भाषणं ऐका, मी म्हटलंय, मला तुम्ही पक्षाबाहेर ढकलतायत. मी विधानसभेतही बोललो, आजही बोलतोय, माझा काय गुन्हा आहे ते आजंही सांगावं. मी लाचार नाही, मी कुणाचे पाय चाटत बसलेलो नाही, मी स्पष्ट बोलतो, एवढाच काय तो माझा गुन्हा असेल.
माझ्या बरोबर कोणताही आमदार खासदार राष्ट्रवादीत येत नाही. रक्षा खडसेंचा निर्णय या खासदार म्हणून ते स्वतंत्र घेतील. रक्षा खडसेंचा निर्णय भाजप सोडणार नसल्याचा दिसून येत आहे. त्यांचा काय तो निर्णय रक्षा खडसे यांनी घ्यावा.
रक्षा खडसे त्याच पक्षात राहिल्या तर काय बोलणार... कारण राजकारणात माधवराव सिंधिया यांची सारखी घराणी एकाच घरातून वेगवेगळ्या पक्षात काम करत राहिले. विखेपाटील आता भाजपात असले तरी त्यांच्या सौभाग्यवती जि.प. अध्यक्ष आहेत काँग्रेसकडून.
२७ वर्षात मी जळगाव जिल्ह्यात सहकारी संस्था ताब्यात आणल्या, यांच्यावर हे शक्य झालं नाही. मी जेवढे सदस्य वाढवले तेव्हा संस्था आता कुठे यांच्या ताब्यात आल्या, हे कुणाच्या उपकारावर आणले नाही, आता आणून दाखवावं यांनी.