नाथाभाऊंनी पक्ष सोडताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया....

पाहा ही बातमी कळताच काय म्हणाले देवेंद्र फडणवीस 

Updated: Oct 21, 2020, 02:24 PM IST
नाथाभाऊंनी पक्ष सोडताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया....  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे eknath khadse यांनी बऱ्याच चर्चांच्या वर्तुळात अखेर पक्षाला रामराम ठोकला. खडसेंच्या या निर्णयानंतर भाजपला हादरा बसला तर, राष्ट्रवादीमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. खुद्द जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकर परिषद घेत मध्यमांना यासंदर्भातील माहिती दिली. राजकीय वर्तुळातील ही मोठी बातमी कानावर पडताच राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली. 

इथं एकनाथ खडसे यांनी पक्षाला अलविदा केल्याची अधिकृत घोषणा होताच तिथे पाहणी दौऱ्यावर असणाऱ्या फडणवीसांना माध्यमांनी घेरत त्यांना यासंबंधीचा प्रश्न विचारला. त्यावर, खडसे यांच्या राजीनाम्याबाबत अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नसल्याचं सांगच फडणवीस यांनी आपण राजीनाम्याची माहिती मिळताच त्यावर बोलू असं स्पष्ट केलं. 

 

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि खडसे या समीकरणात मीठाचा खडा पडला होता. किंबहुना खुद्द खडसे यांनी कित्येकदा आपली नाराजी बोलूनही दाखवली होती. इतकंच नव्हे, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत नाराजीचा सुर आळवल्याचंही पाहायला मिळालं होतं. अखेर पक्षात प्रदीर्घ काळापासून नाराज असणाऱ्या खडसेंनी पक्षत्याग केला. जवळपास ४० वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रीय असलेले एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला डावललं जात असल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती.