एकनाथ खडसे यांचा रक्षा खडसेंविरोधात निवडणुक न लढण्याचा निर्णय संशयास्पद; शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप

Maharashtra Politics : रावेर लोकसभेतून रक्षा खडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर सुरू झालेलं नाराजीनाट्य कायम आहे. तिकीट नाकारल्यानं अमोल जावळे यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांकडून अमोल जावळे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Updated: Mar 18, 2024, 06:12 PM IST
एकनाथ खडसे यांचा रक्षा खडसेंविरोधात निवडणुक न लढण्याचा निर्णय संशयास्पद; शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप  title=

Lok Sabha Election 2024 :  जळगाव रावेर मतदार संघातून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे.  याच मतदार संघातून एकनाथ खडसे यांचे नाव देखील चर्चेत होते. यामुळे जळगावात सासरा विरुद्ध सून अशी लढत होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर होताच एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.  रक्षा खडसेंविरोधात निवडणुक न लढण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी जाहीर केला. एकनाथ खडसे यांचा रक्षा खडसेंविरोधात निवडणुक न लढण्याचा निर्णय संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटातील एका नेत्यानेच हा आरोप केला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटात गटबाजी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गटबाजी दिसून येत आहे.  भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते सतीश पाटील खडसेंची भूमिका संशयस्पद असल्याचा आरोप केलाय. आता रक्षा खडसेंविरोधात जाणीवपूर्वक कमी ताकदीचा उमेदवार दिला जाईल असं सतिश पाटलांनी म्हंटलंय. तर निवडणूक लढवायची की नाही हे सांगणारे तुम्ही कोण असा सवाल खडसेंनी विचारलाय. 

या अरोपांमुळे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. आम्ही स्वतः एकनाथ खडसे नाही तर रोहिणी खडसे यांनी रावेर लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी केली होती. मात्र, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने त्यांची भूमिका संशयस्पद असल्याची जोरदार चर्चा जनतेत सुरू असून माझ्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना देखील एकनाथ खडसे यांची भूमिका संशयस्पद असल्याचे वाटत असल्याचा आरोप माजी मंत्री सतीश पाटील यांनी केला आहे. 

पक्ष आदेश दिला तर मी निवडणूक लढेल - एकनाथ खडसे 

मला निवडणुका लढवायची की नाही तुम्ही सांगणारे कोण पक्ष आदेश देईल तर मी निवडणूक लढेल असे जोरदार प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी माजी मंत्री सतीश पाटील यांना दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गटबाजी दिसून येत असून एकनाथ खडसे हे चक्रव्यूहात फसले असल्याचे दिसून येत आहे. मात्र या नाराजीचा मोठा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला बसेल असे देखील चिन्ह असल्याचे एकंदर चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे

भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना घरातून आव्हान नाही

बहुचर्चित रावेर लोकसभा मतदारसंघात खडसे विरूद्ध खडसे लढत होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. प्रकृतीच्या कारणानं आपण निवडणूक लढवणार नसल्याचं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय. तसंच मुलगी रोहिणी खडसेही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना घरातून आव्हान मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. रावेरची जागा राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे आहे. पवारांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची बैठक घेतली. उद्यापर्यंत उमेदवार ठरवण्यात येईल अशी माहिती खडसेंनी दिली.