ड्रग्ज माफिया ललित पाटीलची ससून रुग्णालयात अय्याशी! कधी सिगारेट तर कधी मैत्रिणीच्या कुशीत... धक्कादायक फोटो

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला काल बंगळुरुमधून अटक केल्यानंतर मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं असता 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, तुरुंगवास सुरु असताना ललित पाटीलच्या अय्याशीचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत. 

Updated: Oct 19, 2023, 06:06 PM IST
ड्रग्ज माफिया ललित पाटीलची ससून रुग्णालयात अय्याशी! कधी सिगारेट तर कधी मैत्रिणीच्या कुशीत... धक्कादायक फोटो  title=

Durgs Mafia Lalit Patil : ड्रग्जमाफिया ललित पाटीलचे ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) सुरू असलेल्या रासलीलेचे धक्कादायक फोटो आता बाहेर आले आहेत. हे सर्व फोटो झी 24 तासच्या हाती लागले आहेत. ललित पाटील (Lalit Patil)कधी मैत्रीणीच्या कुशीत मौजमजा करताना दिसतोय तर कधी ससून रुग्णालयात मोठ्या ऐटीत सिगरेटचे झुरके मारताना दिसतोय. विशेष ही सर्व मौजमजा तुरूंगवासात असताना सुरू होती. अनेकदा ललित पाटील 16 नंबर वॉर्डमधून ससून रुग्णालयाच्या जवळच असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाला जायचा. तर कधी शॉपिंगसाठी मॉलमध्ये फेरी मारायचा, हे सगळं या फोटोच्या माध्यमातून समोर आलं आहे. 

रुग्णालयात सिगरेटचे झुरके
ललित पाटील चक्क ससून रुग्णालयाच्या खिडकीत बसून सिगारेटचे झुरके मारायचा. इतक त्यासोबतच मैत्रिणीसोबत मौज मजा सुरु असल्याचे फोटोदेखील समोर आले आहे. त्यामुळे ललितचा रंगीत-संगीत तुरुंगवास सुरु होता, असं समोर येतं आहे. कधी तोंडात सिगारेट, तर कधी पंचतारांकित हॉटेलमध्ये मैत्रिणीच्या बाहुपाशात मौजमजा असा ललित पाटीलचा तुरुंगवास सुरु होता. 

ललित पाटीलचा रंगीत-संगीत तुरुंगवास
ललित पाटीलचे हे सगळे फोटो काही महिन्यापूर्वीचे आहेत. ललित पाटील उपचारांसाठी ससून रुग्णालयात भरती होता. कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्डमध्ये बंद असलेल्या ललितकडे दोन आयफोन होते. या फोनवरून तो ड्रग रॅकेट तर चालवायचाच त्याचबरोबर मैत्रीणींशी तो चॅटिंग देखील करायचा. त्या चॅटिंग दरम्यान फोटोही शेअर केले जायचे. अनेकदा ललित 16 नंबर वॉर्डमधून ससून रुग्णालयाच्या जवळच असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाला जायचा. तर कधी शॉपिंगसाठी मॉलमध्ये फेरी मारायचा, हे सगळं या फोटोच्या माध्यमातून समोर आलं आहे. तरुणाईला ड्रगच्या विळख्यात अडकवणाऱ्या ललिताचा स्वतः मात्र असा रंगीत-संगीत तुरुंगवास सुरु होता.

ललित पाटील हा प्रेयसी प्रज्ञा कांबळे हिच्यासोबत पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मौज मजा करतानाचे फोटोही समोर आले आहेत. ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर ललित पाटील याच पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्याच सी सी टी व्ही फुटेज समोर आलं होतं . त्याचबरोबर त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे याला देखील तो पुण्यातील सोमवार पेठेतील एका सोसायटीत भेटल्याचा समोर आलं होतं . आणि आता तर ललित पाटीलचे प्रेयसी प्रज्ञा कांबळे हिच्यासोबत हॉटेलमध्ये मौजमजा करतानाचे फोटो समोर आलेत . त्यामुळं येरवडा कारागृहाच प्रशासन आणि ससून रुग्णालयाचे व्यवस्थापन ललित पाटीलने कसं आपल्या मुठीत ठेवलं होतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. ललित पाटील मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची मैत्रीण प्रज्ञा कांबळे हिलाही नाशिक मधून अटक करण्यात आली . नाशिकमधील प्रज्ञान कांबळेच्या राहत्या घरातून सोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. 

ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक
ड्रग्जमाफिया ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केलीय. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी दोन्ही मैत्रिणींची नावं असून ललितला ससूनमधून पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे .या दोघींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. ललित पळून गेल्यानंतर प्रज्ञाच्या घरी तो एक राहिल्याची माहिती समोर येतीय. तसंच तिनं ललितला पळून जाण्यासाठी 25 लाख रुपये दिल्याचं समोर आलंय. फरार झाल्यानंतर ललित या दोघींच्या संपर्कात होता. ड्रग्सच्या काळ्या कमाईतून मिळवलेला पैसा ललित पाटीलने या दोघींकडे ठेवल्याची माहिती आहे. नाशिक पोलिसांनी बुधवारी रात्री या दोघींना अटक केलीय.