बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी आता ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर...

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 4, 2017, 08:09 PM IST
बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी आता ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर... title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

नाशिक : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. लखमापूर गावाजवळ गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोन मुलांचा बळीही गेला आहे. काही जनावरंही बिबट्याने मारली. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली जात आहे. लखमापूर भागात २२ पिंजरेही लावण्यात आले आहे. ३० हून अधिक कर्मचारी सध्या इथे तैनात आहेत.