मालकाच्या मुलीला पळवलं म्हणून मदत करणाऱ्यासह प्रियकरालाही मालकानं असं संपवलं

पुण्यातील चाकणमध्ये प्रेम प्रकरणातून डबर मर्डर झाल्याची घटना घडलीयं. 

Updated: Jul 17, 2021, 09:11 PM IST
 मालकाच्या मुलीला पळवलं म्हणून मदत करणाऱ्यासह प्रियकरालाही मालकानं असं संपवलं title=

हेमंत चोपुडे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील चाकणमध्ये प्रेम प्रकरणातून डबर मर्डर झाल्याची घटना घडलीयं. वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराचं मालकाच्या मुलीवर प्रेम जडलं. त्यानंतर या मजूराला त्याच्या सहकारी मित्राने या दोघांना पळून जाण्यासाठी मदत केली. या रागातून मालकाने या दोघांची हत्या केल्याची पोलिस तपासातून निषपन्न झालंय. (Double murder in love affair at Karanjvihire in Chakan at Pune districts police arrested 9 people)
 
सविस्तर जाणून घेऊयात....

पुण्यातील चाकणमध्ये करंजविहीरेत बाळू मरगज यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. त्यांच्या वीटभट्टीवर बाळू गावडे आणि त्याचा मित्र राहुल गावडे हो जीवलग मित्र काम करायचे. बाळू मरगज यांचां वीटभट्टी व्यतिरिक्त हॉटेलचा व्यवसायही आहे. बाळू मरगजला 21 वर्षीय मुलगी आहे. 

बाळू आणि मालकाची  21 वर्षीय मुलीचं प्रेमप्रकरण जुळलं होतं. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र मुलीच्या घरच्यांना या प्रेमाला विरोध होता. या विरोधामुळे दोघांमध्ये बाळू मरगजचा अडथळा निर्माण झाला. यामुळे दोघांना पळून जाता येत नव्हते. 

अशा वेळेस बाळू गावडेचा मित्र राहुल गावडेने या दोघांना पळून जाण्यासाठी मदत केली. त्यानुसार बाळू, राहुल आणि मालकाची मुलगी या तिघांनी प्लॅन केला. त्यानुसार राहुलच्या मदतीने  या दोघांनी 15 जुलैला धूम ठोकली. काही वेळानंतर मुलगी पळून गेल्याचं मालकाच्या घरच्यांना कळलं. 

मुलगी पळून गेल्याचं मालकाला समजताच त्याचा पारा चढला. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मालकाच्या घरच्यांनी शोधाशोध सुरु झाली. अवघ्या काही तासांमध्ये बाळू मरगजने बाळू गावडे आणि त्याचा मित्र राहुल गावडेला शोधून काढलं. त्यांच्या सोबत त्याची मुलगीही होती. बाळू मरगजने या तिघांना आपल्या हॉटेलवर नेलं. तिथं त्याने या दोघांना बेदम चोप दिला. बाळू मरगजने या दोघांना अमानुषपणे मारहाण केली. 

मारहाण करण्यासाठी लोखंडी रॉड आणि दांडक्याचा वापर केला. तसेच तापत्या सळईचे चटकेही दिले. त्यामुळे या दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर या मारहाणी दरम्यान बाळू मरगजच्या मुलीलाही दुखापत झाली.  दरम्यान तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान या अमानुष मारहाणीप्रकरणी चाकण पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांसह इतर 9 जणांवर गुन्हा दाखल करत अटक केलीय.