मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज पुन्हा वाढ झाली आहे. महाराष्ट्रात आज (17 जुलै) 8 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचं निदान झालंय. तर रिकव्हरी रेटमध्ये 1 टक्क्याने वाढही झालीय. तर दिवसभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत किंचतशी घट झालीये. त्यामुळे राज्याला काही प्रमाणात दिलासा मिळालाय. (In Maharashtra Today 17 jul 2021 8 thousand 172 new corona positive patients found)
राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 8 हजार 172 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण दिवसभरात कोरोनामुक्त झालेत. राज्यात दिवसभरात 8 हजार 950 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील आतापर्यंत 59 लाख 74 हजार 594 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या रिकव्हरी रेटमध्ये 1 टक्क्यांनी वाढ झालीय. राज्याचा सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 96.28% इतका झालाय.
तसेच राज्यात आज 124 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर हा 2.04 % इतका आहे. राज्यात आज एकण 1 लाख 429 सक्रीय रुग्ण आहेत.
मुंबईतील आकडा
मुंबईत आज 466 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 806 जणांनी कोरोनावर मात केलीय. मुंबईत आतापर्यंत एकूण 706040 रुग्ण बरे झालेत. तर मुंबईच्या रिकव्हरी रेटमध्ये 1 टक्क्याने वाढ होऊन तो 97 टक्के इतका झालाय. मुंबईत सध्या एकूण 6 हजार 618 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.
#CoronavirusUpdates
१७ जुलै, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण - ४६६
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ८०६
बरे झालेले एकूण रुग्ण - ७०६०४०
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९७%एकूण सक्रिय रुग्ण- ६६१८
दुप्पटीचा दर- ९९३ दिवस
कोविड वाढीचा दर ( १० जुलै ते १६ जुलै)- ०.०७% #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 17, 2021