नागपुरात शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार, चक्क कुत्र्याचा वावर

 आरोग्य विभागाचा आणखी एक गलथान प्रकार समोर आला आहे.  

Updated: Feb 2, 2021, 07:50 PM IST
नागपुरात शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार, चक्क कुत्र्याचा वावर  title=

नागपूर : यवतमाळमध्ये लहान मुलांना पोलियो ड्रॉप्स ऐवजी सॅनिटायजर पाजल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता आरोग्य विभागाचा आणखी एक गलथान प्रकार समोर आला आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या (Nagpur Government Hospital  ) वार्डात रुग्ण झोपलेले असताना  त्यांच्यामध्ये दोन कुत्रे फिरत ( Dog was walking) असल्याचे समोर आले आहे.

या संदर्भात एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून त्यामध्ये रुग्णालयातील वार्डात दोन कुत्रे रुग्णाच्या खाटांच्या अवतीभवती आणि त्याच्या खाली फिरत असल्याचे दिसत आहे. सर्व रुग्ण झोपलेले असल्यामुळे रात्रीच्या वेळचा हा व्हिडीओ असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, एका बाजूला वार्डामध्ये रुग्णालय मधील कर्मचारी यांच्याशिवाय फक्त रुग्णांच्या ठराविक नातेवाईकांनाच प्रवेश असते... प्रत्येकी वार्डाच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात असतो... त्यामुळे वार्डाच्या आत कुत्र्यांचा प्रवेश रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर विषय आहे.