अरे बापरे! श्वानाच्या मुत्राशयातून हे काय काय निघालं? जिल्यातील दुर्मिळ घटना

माणसाला बोलता येतं म्हणून आपल्याला काय दुखतंय, काय होतंय हे सांगता येतं. मात्र प्राण्यांचं तसं नाही. अशात वर्ध्यातील जस्सीला प्रचंड वेदना होत होत्या. पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे तिला नेलं असता तिच्या मूत्राशयात तब्बल 108 खडे आढळून आलेत 

Updated: Nov 3, 2022, 10:53 PM IST
अरे बापरे! श्वानाच्या मुत्राशयातून हे काय काय निघालं? जिल्यातील दुर्मिळ घटना title=

वर्धा (मिलिंद आंडे) - माणसांमध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या आजाराबाबत आपण नेहमीच ऐकत असतो. पण माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्ये सुद्धा विविध आजार (Medical Problems In Pets) उद्भवल्याचे आढळून येते. प्राणिमात्रांना नेमकं काय होतं हे बोलून सांगता येत नाही. अशात आजाराचं निदान करणं आणि त्यानंतर त्याचे उपचार करणं सोपी गोष्ट नाही. माणूस आपले दुःख आणि आजाराचे विश्लेषण डॉक्टरांसमोर मांडू शकतो. त्याला नेमका काय त्रास आहे हे बोलण्यातून व्यक्त करू शकतो. मात्र प्राण्यांमध्ये असे नाही. प्राणी आपले दुःख बोलून दाखवू शकत नाही त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे हे तितकेच कठीण कार्य आहे. त्यांच्या त्रासावरून आणि शरीररचनेचे अध्ययन करून त्यांच्यावर पशुवैद्यकांना उपचार करावे लागतात.

जस्सीचा काढला एक्सरे : 

यामध्ये सेवाग्राम येथील रवींद्र लावणे यांची कुत्री जस्सीला अचानक लघवी करतांना असहाय वेदना ( Insae paine while peeing ) व्हायला लागल्या. लावणे यांनी लगेच वर्धेतील पशुवैद्य डॉ. संदीप जोगे यांच्या दवाखान्यात तिला उपचारार्थ ( veterinary doctor) दाखल केले असता डॉक्टरांनी तिच्या मूत्राशयाच्या एक्सरे ( X Ray) घेण्याचे ठरविले. एक्सरे झाल्यानंतर तिच्या मूत्राशयात मोठे खडे असल्याचे निदान झाले. म्हणजेच तिला Bladder Stone असल्याचे कळले. त्यांनतर डॉ. संदीप जोगे यांनी तिची शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या मूत्राशयातून तब्बल 108 खडे डॉक्टरांनी अत्यंत बारकाईने यशस्वी रित्या बाहेर काढले.

जिल्यातील पहिली आणि दुर्मिळ घटना : 

माणसांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सामान्य आहेत. मात्र असे असले तरी एखाद्या प्राण्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येत खडे निघण्याची ही जिल्यातील पहिली आणि दुर्मिळ घटना आहे. सदर यशस्वी शस्त्रक्रियेनंतर जस्सीला तिच्या वेदनापासून मुक्ती मिळाली आहे आणि सद्यस्थितीत ती सुदृढ अवस्थेत आहे.

dog detected with 108 bladder stones in wardha rare incedent in Warda