राळेगणसिद्धी : मतदान यंत्रावर उमेदवाराचा फोटो असल्याने आता पक्षाचे चिन्हे नको, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. निवडणूक चिन्हे हद्दपार झाल्याशिवाय खरी लोकशाही शक्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. निवडणुका आणि मतदान प्रक्रिया यातील त्रुटींचा आणि प्रश्नांचा पाठपुरावा करतच राहू असं अण्णांनी म्हटले आहे.
दरम्यान, व्हीव्हीपॅटच्या पन्नास टक्के पावत्यांची मोजणी करण्याची मागणी २१ विरोधी पक्षांनी केली आहे. याबाबतची पुनर्विचार याचिका विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याआधीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका रद्दबातल ठरवत फक्त पाच ठिकाणच्या व्हिव्हिपॅटच्या पावत्यांची मोजणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.