केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसहाज अहिरांची आगळीवेगळी दिवाळी

बलिप्रतिपदा हा दिवस विदर्भात गोईगोधन नावाने साजरा केला जातो. देशभर गोवर्धनपूजेच्या निमित्ताने वर्षभर कामाला जुंपलेल्या गाय-बैल-म्हशींची विधिवत पूजा केली जाते.

Updated: Oct 20, 2017, 09:06 PM IST
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसहाज अहिरांची आगळीवेगळी दिवाळी  title=

चंद्रपूर : बलिप्रतिपदा हा दिवस विदर्भात गोईगोधन नावाने साजरा केला जातो. देशभर गोवर्धनपूजेच्या निमित्ताने वर्षभर कामाला जुंपलेल्या गाय-बैल-म्हशींची विधिवत पूजा केली जाते.

चंद्रपुर शहरात नेहरूनगर भागात सरोदी समाज पारंपरिक पद्धतीने पशुपालक मानला जातो. या ठिकाणी या समाजाची मोठी वस्ती आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी महापौर आणि इतर सहकाऱ्यांसह नेहरूनगर इथे गोवर्धनपूजेत सहभाग घेतला.

वर्षभर काबाडकष्ट करून पशुपालन करणाऱ्या पशुसेवकांचा या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

ही  परंपरा आपण जोपासली आणि वृद्धिंगत केली पाहिजे अशी भावना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी याप्रसंगी व्यक्त केली.